Pimpri Police | लष्करी अधिकार्‍यांची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) नितीन पाटील –  लष्कर प्रमुख जनरल नरवणे (Army Chief General Narwane) हे पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी टाटा मोटर्स आणि तळेगाव येथील ‘एल अँड टी’ ला भेट दिली होती. त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) दलातील बंदोबस्तासाठी संवेदनशिल ठिकाणी आणि हेलीपॅड येथे कर्तव्यास असलेल्या पोलिस अंमलदारांनी एकत्र येवुन मोबाईलचा वापर केला. तसेच चॅटींग करणे, गप्पा मारणे आणि फोटो काढणे असे गैरवर्तन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाची लष्करी अधिकार्‍यांनी (Army Officers) गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड पोलीसांवर (Pimpri Chinchwad Police) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत लष्करी अधिकार्‍यांकडून राज्य गृह विभागाला देखील कळविण्यात आल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे. घडलेल्या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण अशी चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये सुरू आहे. लष्करी अधिकार्‍यांच्या नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार याबाबत देखील कुजबूज सुरू झाली आहे.

 

लष्कर प्रमुख जनरल नरवणे हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते.
त्यांनी टाटा मोटर्स आणि तळेगाव एल अँड टी ला भेट दिली होती.
लष्कर प्रमुख पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत असताना बंदोबस्ताच्या वेळी हेलिपॅड व इतर अतिसंवेदनशील ठिकाणच्या बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त होते. काही पोलीस अंमलदार फोटो सेशन करत होते.
तर काही कर्मचारी मोबाईल फोनवर चॅटींग, गप्पा मारणे असे गैरवर्तन करत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लष्करी अधिकार्‍यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी एक आदेश जारी केला आहे.
हेलीपॅड व कार्यक्रमाच्या ठिकाणी गैरवर्तन, बेशिस्तपणा होऊ नये यासाठी प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक केली होती.
मात्र, प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बंदोबस्तातील अंमलदार यांनी अतिसंवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना मोबाईलचा वापर करुन कर्तव्यात हलगर्जीपणा केला.
त्यामुळे शिस्तप्रिय पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) बंदोबस्तावर तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करतात हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, बंदोबस्तास निुयक्त करण्यात आलेल्या पोलिसांनी नेमकं कोणाचे अनुकरण करत फोटो सेशन केले आहे याबबातची ‘खमंग’ चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे.

 

दरम्यान, महत्त्वाच्या पोलीस बंदोबस्तामध्ये ज्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यांनीच मोबाईलचा वापर करावा.
तसेच बंदोबस्तावर तैनात असलेल्या अंमलदार यांना मोबाईलचा वापर करता येणार नाही.
जर एखादा पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असताना फोनवर बोलत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात येणार आहे.
तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.
त्यामुळे लष्कर प्रमुखांच्या बंदोबस्तादरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार की ‘सक्त ताकीद’ देण्यात येणार हे आता स्पष्ट होणार आहे.

 

Web Title : Pimpri Police | Army intelligence offset on Pimpri-Chinchwad police, Who is responsible?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Free Ration | आता रेशन कार्ड नसतानाही मोफत मिळेल रेशन, जाणून घ्या महाराष्ट्रात लागू आहे ही सुविधा की नाही

Pune Corporation | विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

Mumbai High Court | राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला न्यायालयाने दिली स्थगिती