पिंपरी : 3 लाखांच्या बनावट नोटा जप्त; तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट नोटा बाजारपेठेत आणणाऱ्या रॅकेटला जेरबंद करुन पिंपरी पोलिसांनी दोन लाख 98 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही घटना खंडोबामाळ, आकुर्डी येथे रविवारी (दि. 16) रात्री घडली.

अभिषेक प्रदीप कटारिया, ओंकार शशिकांत जाधव आणि सुरेश भगवान पाटोळे या तिघांना अटक केली आहे. पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे यांनी सोमवारी (दि. 17) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गाडी मध्ये बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली. पोलिसांनी एमएच-14-जीवाय-6060 या मोटारीतून दोन हजार रुपयांच्या 149 नोटा (दोन लाख 98 हजार रुपये) जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, राजेंद्र निकाळजे (गुन्हे) आणि त्यांच्या पथकाने केली आहे.