तब्बल 14 वर्षापासून फरार असलेला आरोपी अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात चौदा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक केली. सुनील हणमंत जाधव (48, रा. राघोबा पाटील नगर, खराडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2006 साली आरोपी सुनील याने घरफोडी केली होती. त्यानंतर तो पसार झाला. मागील चौदा वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. शनिवारी (दि. 22) गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांना माहिती मिळाली की, आरोपी सुनील हा मुंढवा परिसरात राहत आहे. त्यानुसार, परिसरात त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, संपत निकम, संजय पंधरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, विपुल जाधव, चेतन मुंढे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली आहे.

You might also like