ATM फोडणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडू एटीएम आणि घरफोडीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहे. शहरामध्ये एटीएम सेंटर फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यातील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने टोळीतील चार जणांना अटक केली आहे.

अभिजित उर्फ निकेतन गोकुळ सावळवे (वय-22 रा. हरि निवास बिल्डींग, नाशिक), राहुल भगवान साळवे (वय-24 रा. नाशिक), अरुण ज्ञानेश्वर भांगरे (वय-24 रा. संगमनेर, जि. अहमदनगर), सागर अनिल दैवज्ञ (वय-25 रा. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई आळेफाळा पोलिसांनी केली होती. आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत आणि चिखली येथे घडलेल्या गुन्ह्याशी मिळती जुळती असल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये नाशिक येथील उत्तमनगरमधील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्र्यंबकेश्वर रोडवरील बाबा महाराज मठात घरफोडी केल्याचे कबुल केले.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, सहायक पोलीस फौजदार सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, सचिन असवले, सोमनाथ बोऱ्हाडे, कबीर पिंजारी, विशाल भोईर, महादेव जावळे, नितीन खेसे, पंकज भदाने, प्रविण पाटील यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/