पिंपरी : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला हैद्राबाद येथून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का अंतर्गत कारवाई केली असताना पाच महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन हैद्राबाद येथे लपून बसलेल्या सराईत गुन्हेगार टोळीप्रमुखास वाकड पोलिसांनी अटक केली.

आरोपी अनिकेत अर्जुन चौधरी (29, रा प्रेरणा शाळेजवळ लक्ष्मणनगर थेरगाव) याला वाकड पोलीसांनी आज अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत चौधरी हा टोळीप्रमुख आहे. त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत. त्याच्यावर गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिली एमपीडीए कारवाई अनिकेत चौधरी याच्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये करण्यात आली होती . त्यानंतर देखील त्याने थेरगाव परिसरात त्याच्या साथीदारांसह धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली होती. पाच महिन्यापासून अनिकेत चौधरी हा पिंपरी चिंचवड येथून फरार होता त्याला हैदराबाद येथे अटक करून पिंपरी चिंचवडमध्ये आणले आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, कर्मचारी प्रमोद कदम , विजय गंभीरे , दिपक भोसले , तात्या शिंदे , शाम बाबा , संतोष शिंदे , विक्रम जगदाळे , बापुसाहेब धुमाळ , जावेद पठाण , बाबाजान इनामदार , विक्रम कुदळ , सचिन नरुटे , नितीन गेंगजे , प्रशांत गिलबिले यांनी केली .