सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तूल, जिवंत काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण एमआयडीसी मध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली आहे.

ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (23, रा. कोरेगाव बुद्रुक, खेड, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक लांडगे, हवालदार लांडे, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विजय मोरे हे पाहिजे असलेले, फरार व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत होते.

त्यावेळी महेंद्रा कंपनी निघोज, चाकण येथे एक व्यक्ती पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या टीमने सापळा रचून ऋषिकेश याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. तपास पोलीस करत आहेत.