कंपनीतून काढल्याच्या रागातून मारहाण, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मारुंजी येथे कंपनीतून कामावरून काढल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 25) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वैभव तुकाराम पुदाले (26, रा. माण, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सौरभ संभाजी सुतार (22), स्वप्नील राम येवले (21, दोघे रा. पाचाणे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या दोघांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव आणि आरोपी हे एकाच कंपनीत काम करत होते. आरोपी सौरभ याला कंपनीतून काढून टाकले. वैभव यांच्यामुळेचा आपल्याला कंपनीतून काढून टाकल्याचा समज सौरभ याला होता. या संशयातून सौरभ याने अन्य आरोपींच्या मदतीने वैभव यांना सोमवारी रात्री कारमधून जबरदस्तीने बसवून नेले.

मारुंजी येथे बायपास रोडच्या कंपाउंडयामध्ये नेऊन हॉकी स्टिक व कोयत्याने वैभव यांना मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारून आरोपी वैभव यांच्या छातीवर उभे राहिले. यामध्ये वैभव गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like