पिंपरी : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले असताना राजरोसपणे परिसरात फिरताना तडीपार गुंडास चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे स्टाफसह चिंचवड हद्दीतील फूटपाथ, पान टपरी, चायनीज गाड्यांवर दारू पिणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस नाईक शेलार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार गुन्हेगार मयूर घोलप हा गुरुमैया शाळेजवळ गाडीतून फिरत आहे. अशी माहिती मिळताच अभिजित जाधव यांनी सापळा रचून स्विफ्ट गाडीतील संशयितास ताब्यात घेतले.

मयूर अनिल घोलप (रा.चिंचवड) हा असल्याची खात्री पटली, त्यास पुणे जिल्ह्यातून 02 वर्षासाठी तडीपार केले आहे .सदर इसमाची गाडी चेक केली असता ड्रायवर सीटखाली लोखंडी कोयता मिळाला आहे.
हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दारोड्याचे, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडील लोखंडी कोयता व स्विफ्ट कार जप्त केली आहे.

हि कामगिरी पोलिस उपायुक्त स्मिता पाटील , सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री भीमराव शिंगाडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक अभिजित जाधव, हवालदार जगताप, शेलार, डोके, राठोड यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like