Pimpri : काळेवाडीतील जुगार मटका अड्यावर पोलिसांचा छापा, 20 ते 30 जणांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून मटका खेळण्यासाठी येत असलेल्या काळेवाडी येथील मटका अड्यावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी अल्पवयीन मुलेही असल्याचे छाप्या दरम्यान समोर आले आहे. जुगार मटका खेळणाऱ्या 20 ते 30 जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. तर 47 हजार 170 रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केले आहे.

श्रीनगर येथील धनलक्ष्मी नावाच्या पानटपरी व टपरीच्या पाठीमागे विशाल जुन्नर बँकचे समोर लोखंडी पत्र्याचे बंदिस्त शेडमध्ये हा मटका अड्डा सुरु होता. याबाबत सुनिल जगन्नाथ सिरसाठ पोलीस हवालदार सामाजिक सुरक्षा पथक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मटका चालक संदिप किसन तरई ( ३८ , रा . मातोश्री निवास शिवशंभो कॉलनी , श्रीनगर , बरगाव रोड , रहाटणी), गजेंद्र शिवाजी इडले , (३५ , रा वराळे फाटा भोंगाडे कॉलनी , राम नं .०८ , तळेगाव दाभाडे ), सतिश वसंत कांबळे, सनिशा रसाळ (१९ , रा. बेयोन इंग्लिश मिडियम स्कूल समोर , स्वास्तिन कॉलनी , तापकीरनगर , काळेवाडी), संतोष सुभाष गिरी (२४, रा जयमल्लार नगर गल्ली नं ०४ बोरगाव , पुणे), अमर भिमराव गाडे (३३ , रा ६/१ बारणेचाळ , कैलासनगर), विनय शंकर शिंदे (३४, रा. जयमल्हार नगर , म.न. ०५ माताश्री निवास , बेरगाव), मोहन नरसिंग कनामे (३१, रा. गुरुनानक नगर बेरमाय ), सुनिल विश्वनाथ ठाकुर (२५, रा.श्रीनगर, जयमल्हार कॉलनी, थेरगाव), विजय तलवारे व इतर 19 जणांना सीआरपीसी ४३ ( अ ) ( १ ) प्रमाणे नोटीस देवुन सोडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तीन वाजण्याच्या सुमारास काळेवाडीतील श्रीनगर येथील धनलक्ष्मी नावाच्या पानटपरी मध्ये तसेच टपरीच्या पाठीमागे विशाल जुन्नर बँकचे समोर लोखंडी पत्र्याचे बंदिस्त शेडमध्ये अवैधरित्या जुगार मटका खेळणाऱ्या चालक मालक अशा एकून 20 ते 30 जणांवर कार्यवाही करण्यात आली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.