तळेगावातील जुगार अड्ड्यावर छापा, 12 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तळेगाव दाभाडे येथील राजगुरव कॉलनीमध्ये सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने छापा मारून 29 हजारांचा ऐवज जप्त केला तर १२ जणांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथील एल शद्दाय बंगला येथे काहीजण मटक्याचा जुगार खेळत असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून १२ जणांना अटक केली. आरोपी जनता बाझार मटक्याच्या एजंटकडून मोबाईल फोनद्वारे बेटिंग घेत होते.

पोलिसांनी या कारवाईमध्ये २७ मोबाईल फोन, मटक्याचे साहित्य असा एकूण २८ हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त केला. फौजदार अनिकेत हिवरकर तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like