‘पोलीसनामा’ Impact : ‘स्पा’च्या नावाखाली ‘भलतेच उद्दोग’, पोलिसांची कारवाई, 6 मुलींची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘स्पा’, बॉडी मसाजच्या नावाखाली राजरोसपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सहा मुलींची सुटका केली. तर मालकास चौघांना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई भोसरी एमआयडीसी मधील सीटी मॉल मधील सीटी स्पा सेंटर मध्ये करण्यात आली.

शहरात ‘स्पा’च्या नावाखाली गोरख धंदा सुरु असल्याचे वृत्त पोलिसनामा ऑनलाइन मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याची पोलिसांनी दखल घेतली आहे. भोसरी एमआयडीसी येथील सीटी मॉल मध्ये सीटी स्पा नावाचे मसाज सेंटर असून तेथे स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

गुन्हे शाखेच्या एमओबी आणि पीसीबीच्या पथकाने सापळा रचून बुधवारी सायंकाळी छापा टाकला.
स्पा सेंटर मध्ये आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या सहा मुलींची सुटका केली.

राजेश उर्फ तानाजी व्यंकटराव कानुरे (२९, रा. तळवडे), शिवा नाना कोळपे (२०, रा. भोसरी), स्पा मालक रितेश सुभाष घटकार (२०, रा. भोसरी) विक्रम व्यंकट पलांडे ( रा. तळवडे) या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे. तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –