Pimpri : निगडीत स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 3 मुलींची सुटका

निगडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) निगडी पोलिसांनी (Nigdi police) पर्दाफाश (Brust) केला आहे. या कारवाईत तीन मुलींची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास थरमॅक्स चौकातील ह्युंदाई शोरुमच्या पाठिमागे असलेल्या सुमन मॉल मधील ऑन टाईम ब्यु अँड स्पा मसाज सेंटरमध्ये करण्यात आली. या कारवाईत 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी स्पा सेंटरचा (Spa Center) मालक तानाजी उर्फ राजेश व्यंकट कानुरे (वय-32 रा. रुपीनगर, निगडी) याला अटक केली. तसेच मॅनेजर आणि तीन महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौकातील सुमन मॉल मधील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करुन घेतली असता. मॉलमधील ऑन टाईम ब्यु अँड स्पा मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकून तीन महिलांची सुटका करत स्पा सेंटरच्या मालकाला अटक केली.

हि कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मंचक इप्पर, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, केरबा माकणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र घनवट, पोलीस हवालदार सतीश ढोले, महिला पोलीस हवालदार परविन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, पोलीस शिपाई सोपान बोधवड, दिपक जाधवर यांनी केली.