निगडीत दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निगडी येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह दोघांना अटक करुन 3 लाख 90 हजार 400 रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल, काडतुसे आणि कार जप्त केली आहे.

अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (28, रा. रावेतगाव), परशुराम उर्फ बाब करू गडदे (24, रा. सरगल मळा बोरी पारधी दत्तमंदिराजवळ, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक प्रीतम वाघ यांना माहिती मिळाली की, सोन्या जाधव गावठी कट्टा विक्रीसाठी इनर व्हील क्लब चौक, आकुर्डी येथे येणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस कर्मचारी दिलीप कदम, शाम शिंदे, प्रीतम वाघ, नामदेव वडेकर, शंकर बांगर, किशोर पढेर, विनोद व्होनमाने, विलास केकाण, विजय बोडके, भूपेंद्र चौधरी यांच्या पथकाने इनर व्हील क्लब चौक परिसरात सापळा रचला. सोन्या जाधव रिक्षातून आला आणि संशयितरित्या कारमध्ये (एम एच 14 / ई वाय 7774) बसला.

पोलिसांनी कारला वेढा लावून दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळाला. पोलिसांनी कारसह एकूण 3 लाख 90 हजार 400 रुपये किमतीचा हा ऐवज जप्त केला आहे.

You might also like