पिंपरी : साडे चार लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करुन पोलिसांनी साडे चार लाख रुपये किंमतीचा 18 किलो 137 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कामगिरी आमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी, पवळे उड्डाणपूला खाली केली आहे.

बेबी भारत बाटूगे (52) आणि साहिल मुसा शेख (19, रा. बिलाल चौक, तामपूर, जळगाव) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमली पदार्थ विरोधी पथकाची टीम चिंचवड निगडी परिसरात गस्त घालत होती. त्यावेळी निगडी येथे मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकिर जिनेडी आणि पोलीस नाईक संदीप पाटील या दोघांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर.आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पोळ, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, सहायक उपनिरीक्षक शाकिर जिनेडी, प्रदीप शेलार, संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने पवळे उड्डाणपूलाखाली सापळा रचला. संशयित महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 18 किलो 137 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला.