पिंपरीत जमावबंदी आणि संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 74 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  जमावबंदी आणि संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ७४ जणांवर गुन्हे केले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

करोना विषाणूचा वाढत प्रादूर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश या अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक जण वेगवेगळी कारणे देत घराबाहेर पडत आहेत.

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणाऱ्या एकूण ७४ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित ज्या व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना किमान एक वर्षापर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असंही अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, विनाकारण गर्दी करुन आदेशाचा भंग करु नये, खरच अडचण असल्यास पोलीस प्रशासन सहकार्य करेल, मात्र विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल असेही पोकळे यांनी सांगितले.

You might also like