वाकड आणि दिघी येथील दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवून, परिसरात दहशत माजवणाऱ्या वाकड आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर मोक्‍काची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन 1999) कारवाई करण्यात आलेली आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळी प्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मणनगर, थेरगाव), धीरज श्रीकांत शिंदे (22, रा.जीवननगर, ताथवडे), अजय सुधाकर शिरसाठ (22, रा. जीवननगर, ताथवड), मयूर शिवाजी भोसले (23, रा. जीवननगर, ताथवडे), समीर बोरकर, अशी मोक्‍काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळीप्रमुख अविनाश बाळू धनवे (29, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), ऋषिकेश हनुमंत गडकर (23 रा. काळे कॉलनी, देहूफाटा) जगदीश संजय काकडे (20 रा. इंद्रायणी पार्क, पद्मावती रोड, स्वातीकृपा मंगल कार्यालया शेजारी, आळंदी) अशी मोक्‍काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बुधवारी (दि. 27) मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त, रामनाथ पोकळे उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील विनायक ढाकणे, सहायक आयुक्‍त आर. आर. पाटील रामचंद्र जाधव श्रीकांत मोहिते, यांच्या मार्गदशनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, पीसीबी गुन्हे शाखेचे निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून करून त्याची छानणी केली. तसेच पीसीबी शाखेतील पोलीस हवालदार सचिन चव्हाण, वाकड पोलीस ठाण्यातील सुहास पाटोळे, पोलीस नाईक देडे यांनी हा प्रस्ताव तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.