आळंदीतील सहा सराइत गुन्हेगार तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहा सराइत गुन्हेगारास दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

रेकॉर्ड वरील गुन्हेगार सागर दिलीप लोखंडे (26, रा. मरकळ ता खेड जि पुणे), अक्षय सुरेश लोखंडे )23, रा.मरकळ ता खेड जि पुणे), शुभम मुकेश लोखंडे (24, रा.मरकळ ता खेड जि पुणे), शंकर पांडुरंग लोखंडे )28, रा.मरकळ ता खेड जि पुणे), वाल्मीक ज्ञानेश्वर कोतवाल (24, रा.मरकळ ता खेड जि पुणे), प्रशांत देविदास लोखंडे (25, रा.मरकळ ता खेड जि पुणे) यांना पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय, व पुणे ग्रामीण पोलीस हदीतून 2 वर्ष कालावधी करीता तडीपार करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com