Pimpri Pune Crime | देवदर्शनासाठी गेलेल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Pune Crime | देवदर्शनाला संपूर्ण कुटुंब गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या (Civil Contractor) घरात प्रवेश करुन तब्बल 11 लाखांचे दागिने (Gold Jewelry) आणि 9 लाखांची रोकड (Cash) असा एकूण 20 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरून (Theft) नेला. ही घटना (Pimpri Pune Crime) शुक्रवारी (दि.11) सकाळी सहा ते रविवारी (दि.13) रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोनवणे वस्ती चिखली येथे घडला आहे.

याबाबत शरद पंडित सोनवणे Sharad Pandit Sonwane (वय-33 रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद सोनवणे हे त्यांच्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी तुळजापूर (Tuljapur),
गाणगापूर (Gangapur), अक्कलकोट (Akkalkot) या ठिकाणी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीचा
गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूममधील कपाटाचे
ड्रावर उचकटून त्यामध्ये ठेवलेले 11 लाख 23 हजार रुपये किमतीचे 40 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि
9 लाख रुपयांची रोकड असा एकूण 20 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
फिर्यादी हे रविवारी रात्री आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुमाणे (API Gumane) करीत आहेत.

Web Title :-  Pimpri Pune Crime | theft of 20 lakhs while the family was visiting devdarshan pimpri chinchwad pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप