पिंपरी : जबरदस्तीने दारू पाजून महिलेवर बलात्कार, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केली जबरदस्ती

पिंपरी : टेंडर अ‍ॅप या डेटिंग साईटवरुन झालेल्या ओळखीनंतर तरुणाने हॉटेलमध्ये जबरदस्तीने दारु पाजून घरी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अभिजित सिताराम वाघ (रा. काळेवाडी, वाकड) याला अटक केली आहे. हा प्रकार हिंजवडी येथील हॉटेल एफ एम एल तसेच काळेवाडी येथील आरोपीच्या घरी २६ डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपी आणि या महिलेची टेंडर अ‍ॅपवरुन ओळख झाली होती.

वाघ याने या महिलेला २६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता हिंजवडी येथील हॉटेल एफ एम एल येथे बोलावले. तेथे त्याने तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर त्याने तिला आपल्या काळेवाडी येथील घरी नेले. तेथे तिच्याशी तो लगट करु लागला. तेव्हा या महिलेने विरोध केला. त्यावर वाघ याने तिला लाथाबुक्यांनी, बुटाने, हाताने मारहाण करुन जखमी केले. तिच्यावर बलात्कार केला. वाकड पोलिसांनी वाघ याला अटक केली आहे.