अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर मावस बहिणीचा विनयभंग, 5 जणांना अटक

पिंपरी : निगडी येथील दोन अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने अंधारात नेऊन त्यांच्यातील एका मुलीवर बलात्कार करुन तसेच तिच्या मावस बहिणीचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
करण भैरवनाथ साबळे (वय २१, रा. अजंठानगर, चिंचवड), आशिष आनंद सरोदे (वय २०), निवास संजय सुतार (वय २०), तेजस राजू वाघमारे (वय १९) आणि कार्तिक ऊर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय २१, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आशिष सरोदे याने अल्पवयीन मुलीला अंधारात घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्याचवेळी करण साबळे याने तिच्या मावस बहिणीला जवळ ओढून तिचा किस घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या दोन्ही अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन या दोघांनी त्यांच्या आणखी तीन मित्रांना बोलावून घेतले. मुलींचे अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने अल्टो कारमध्ये बसवून चिंचवड स्टेशनला नेले. या पिडीत मुलीच्या तक्रारीनंतर निगडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.