भाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची

पिंपरी (Pimpri) : भाडे तत्वावर टाटा झेस्ट ही कार घेऊन भाडे न देता, तिघे जण कार घेऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे, पिंपरीसह (Pimpri) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोघा जणांनी अशा प्रकारे गाड्या भाड्याने घेत असल्याचे सांगून त्या परस्पर विकल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले होते. त्यानंतर हा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी हार्दिक सोपानराव बेलेकर (वय २७), गौरव सोपानराव बेलेकर आणि सोपानराव बेलेकर (तिघे रा. शेलार वस्ती, देहु आळंदी रोड, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुकुंद गजानन ताजणे (वय ४८, रा. दत्तनगर कॉलनी, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.

हार्दिक बेलेकर आणि फिर्यादी हे दोघे चालक म्हणून काम करतात.
मुकुंद ताजणे यांनी त्यांची टाटा झेस्ट गाडी १२ ऑक्टोंबर २०२० रोजी लांडेवाडी येथे एका वकिलांच्या कार्यालयात भाडेकरारनामा केला.
महिना १९ हजार रुपये भाडे ठरवून आरोपींना त्यांनी आपली गाडी दिली.
त्यानंतर आजपर्यंत त्यांनी फिर्यादी यांना ना भाडे दिले ना गाडी परत केली.
त्यामुळे फिर्यादी यांनी ते रहात असलेल्या पत्यावर जाऊन शोध घेतला असता ते तेथे रहात नसल्याचे आढळून आले.
त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होत नसल्याचे दिसून आली.
त्यांची ७ लाख १० हजार रुपये किंमतीची कार तसेच प्रति महिना १९ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १४ हजार रुपये भाडे न देता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

हिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

 

Diy Night Cream | गुलाब पाणी अन् बदाम उगाळून बनवा ‘नाईट क्रीम’, चेहर्‍यावर येईल गुलाबी चमक, जाणून घ्या

 

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊनका

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel :  Pimpri | rent car 3 people away