पिंपरी : ‘ड्रेनेज’साठी खोदलेल्या खड्यात 3 तरुण ‘दबले’ गेल्याची शक्यता, फायर ब्रिगेडचा जवान शहीद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात ड्रेनेज साठी पावसाळ्याच्या अगोदर खड्डा काढून ठेवला होता. तेथे काम करत असलेला फायरमन खड्ड्यात पडल्याने दगावल्याचे कळते आहे. विशाल जाधव असे मृत्यू झालेल्या फायरमनचे नाव आहे. तसेच बचाव कार्य करताना अग्निशामक दलाचा जवान शहीद झाल्याचे आयुक्त हार्डीकर यांनी सांगितले. एकूण पाच जणांना बाहेर काढले असून दोघांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. विशाल जाधव, ईस्वर बर्गे, अप्पा सुरवसे, बडगे यांना बाहेर काढण्यात आले आहे. सरोज पुंडे, नितीन गोगावले या दोन फायरमन सह चौघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कामगार नागेश कल्याणी जमादार आणि एक कामगार अजून गाडले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे की, दापोडी परिसरात ड्रेनेज चे काम करत असताना एक कामगार त्यामध्ये अडकला. त्या कामगाराला वाचविण्यासाठी ईतर काम करत असणारे चार कामगार आत गेले असता तेही अडकले. दरम्यान हे पाच कामगार अडकल्याचे समजताच तिथल्या एका कामगाराने तातडीने अग्निशमन दलाला व पोलिसांना फोन केला. व काही वेळातच तेथे अग्निशमन दलाचे कर्मचारी हजर झाले. दरम्यान अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी ड्रेनेजमध्ये बचावासाठी गेले. त्यामध्ये ते सुध्दा अडकुन पडले. परत अग्निशमन दलाच्या काही गाड्या बोलाविण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मच्याऱ्यांनी तीन कामगार व दोन अग्निशमन चे कर्मचारी अशा पाच जणांना बाहेर काढले. शेवटी अग्निशमन दलाचा फारमनला बाहेर काढले त्यांचे नाव विशाल कदम असुन त्यांची प्रकृती चितांजनक आहे.
Dapodi

ड्रेनेजमध्ये अडकलेल्या कामगारापैकी नागेश कल्याणी जमादार आणि एक कामगार असे दोन जण त्यामध्ये अडकलेली आहेत. हे दोन कामगार आत मध्ये अडकलेली असल्यामुळे ते दगावले असल्याची श्यकता पोलिस व अग्निशमन कडून वर्तविण्यात येत आहे.
Dapodi