पिंपरी : ‘ड्रेनेज’साठी खोदलेल्या खड्यात तीन तरुण अडकले, बचावासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात ड्रेनेज साठी पावसाळ्याच्या अगोदर खड्डा काढून ठेवला होता. या खड्यात आज रविवारी सायंकाळी तीन तरुण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

दापोडी येथील चर्चकडे जाणाऱ्या पुलाला लागून सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने ड्रेनेजसाठी मोठा खड्डा काढला होता. त्यांनतर मोठा पाऊस झाला. त्यावर माती साचली गेली. आज सायंकाळी त्याच्या शेजारी असलेल्या भिंतीवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडला, दोन्ही मित्रांना लक्षात येईपर्यंत तो खड्यात गेला आणि वरुन माती गेली. त्याला वाचविण्यासाठी इतर दोघे गेले असता तेही खड्यातच अडकले. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून अजून तीघे आतच आहेत.

घटनेचे माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बचाव कार्यासाठी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसामुळे झालेल्या दलदलीमुळे बचाव कार्यात अडचण येत आहे. अडकलेल्या तरुणांची नावे समजू शकली नाहीत,मात्र २० ते २५ वयोगटातील तरूण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, तरुणांची मदत करण्यासाठी गेलेले दोन जवान खड्ड्यात अडकल्याचे समजते आहे.

Visit : Policenama.com