Pimpri : सिक्युरिटी गार्डनेच केला रुग्ण महिलेचा विनयभंग

पिंपरी : पिंपरी येथील वाय सी एम हॉस्पिटलमधील सिक्युरिटी गार्डनेच रुग्ण महिलेच्या वॉर्डात जाऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अनिल मारुती स्वामी (वय ४७, रा. खडकी बाजार) याला अटक केली आहे. याप्रकरणी रुग्ण महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या वाय सी एम हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेत होत्या. अनिल स्वामी हा हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतो. त्याने २१ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी यांना मी पोलीस आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यांने फिर्यादी यांना हाताला धरुन बाजूला घेऊन गेला व फिर्यादीशी लगट करत त्यांच्याशी अश्लिल चाळे करुन विनयभंग केला. पिंपरी पोलिसांनी स्वामी याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लोंढे अधिक तपास करीत आहेत.