पिंपरी : दुकान उघडी ठेवल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सायंकाळी 6 अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील दुकान खुले ठेवल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना चिखली येथे घडली आहे. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन फळविक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद इरफान अब्दुल हन्नान बागवान (वय 24) आणि मोहम्मद इम्रान अब्दुल रहमान शेख (वय 22 दोघेही रा. राजवाडा चिखली) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक दिपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फळवाले, हातगाडीवाले यांना जाण्यास सांगत होते. त्यावेळी आोरपीनी पोलिसांना शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.