फरशीचा धाक दाखवून फायनान्सचे कलेक्शन करणाऱ्यास लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बालाजीनगर भोसरी येथे फायनान्स कंपनीचे कलेक्शन करणाऱ्या एकाला तरुणाने फरशीचा धाक दाखवून लुटले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सूरज चंद्रकांत कुऱ्हाडे ( 21, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र छबन धनगर ( 53, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनगर हे दत्ता फायनान्स, लांडेवाडी, भोसरी या कंपनीचे डेली लोन कलेक्शनचे काम करतात. 15 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास ते कलेक्शनचे काम करत असताना आरोपी सुरज याने त्यांना फरशीचा धाक दाखवून तुझ्याकडील पैसे दे नाहीतर मारील अशी धमकी देत धनगर यांच्याकडील दीड हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी धनगर यांनी 17 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी आरोपी सुरज कुऱ्हाडे याला एका वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

You might also like