शहरात आणखी एक सराफाचे दुकान फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एकाच रात्रीत दोन सराफ दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना चिंचवड येथे आणखी एक सराफा दुकान फोडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात बालाजी ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like