पिंपरी : गुन्हे शाखेकडून तिन दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका चोरट्याला अटक करुन दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने जप्त केल्या आहेत.

पारस लक्ष्मण दुबे (21, रा. आदर्शनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे आणि धनराज किरनाळे यांना माहिती मिळाली की, तिघेजण एका स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर रावेत येथील भोंडवे कॉर्नरवर आले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या कार्यालयात आणून पोलिसी खाक्या दखवला असता त्यांनी त्यांच्याकडे असलेली दुचाकी वडगाव मावळ परिसरातून चोरली असल्याचे सांगितले. तसेच देहूरोड आणि पिंपरी परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्या असून त्या दुचाकी श्रीनगर, देहूरोड येथे लपवल्या असल्याचेही त्यांनी कबूल केले.

पोलिसांनी 72 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे देहूरोड आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी मौजमजेसाठी वाहन चोरी करत होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.

 

Visit : policenama.com