Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये 587 नवे रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 6 हजारांच्या पुढं

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजाराच्यावर गेली आहे. आज दिवसभरात 587 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 568 रुग्ण शहरातील तर 19 रुग्ण शहराबाहेरील आहेत. दिलासादायक आज दिवसभरात 172 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6061 वर पोहचली आहे.

शहरात रुग्णांची वाढ होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 172 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत शहरात 3681 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकाच दिवशी 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 आणि हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील 86 जणांचा मृत्यू झाला आहे तर हद्दीबाहेरील 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 119 झाली आहे.

हद्दीबाहेरील 19 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यासह 169 जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात सध्या 2265 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आज दिवसभरात चिंचवड, काळेवडी, आकुर्डी, रहाटणी, गांधीनगर, पिंपरी, इंदुरी, पुणे आणि विठ्ठलवाडी येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.