पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील २ उपायुक्‍त, २ सहाय्यक आयुक्‍त आणि ५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील २ पोलिस उपायुक्‍त, २ सहाय्यक पोलिस आयुक्‍त आणि ५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे हे आदेश पोलिस आयुक्‍त के. पद्मनाभन यांनी आज (गुरूवार) काढले आहे.

अंतर्गत बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-

उपायुक्‍त सुधीर हिरेमठ – आयपीएस (परिमंडळ-२ ते मुख्यालय -गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा आणि प्रशासन) आणि विनायक ढाकणे (मुख्यालय ते परिमंडळ-२). सहाय्यक पोलिस आयुक्‍त श्रीकांत मोहिते (देहूरोड विभाग, पिंपरी-चिंचवड ते वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड) आणि सहाय्यक आयुक्‍त संजय भाऊसाहेब नाईक पाटील (नव्याने हजर ते देहूरोड विभाग, पिंपरी-चिंचवड).  पोलिस निरीक्षक नारायण पवार (शिरगाव पोलिस चौकी ते नियंत्रण कक्ष), सुधाकर काटे (युनिट-५ (देहूरोड), गुन्हे शाखा ते सायबर सेल), किशोर म्हसवडे (हिंजवडी वाहतूक विभाग ते शिरगाव पोलिस चौकी), विवेक मुगळीकर (पीसीबी, गुन्हे शाखा ते युनिट-५ (देहूरोड), गुन्हे शाखा) आणि सुनिल दहिफळे (चाकण पोलिस स्टेशन (गुन्हे) ते हिंजवडी वाहतूक विभाग).

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like