पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हे शाखेतील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केलेल्या आहेत.

गुन्हे शाखा युनीट पाचचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची बदली गुन्हे शाखा युनिट तीन येथे झाली आहे. तर युनिट पाच या ठिकाणी विशेष शाखा एकचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष शाखा एक येथे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निगडी वाहतूक विभागाचे निरीक्षक शैलेश गायकवाड यांची गुन्हे शाखा युनिट दोन येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, निवडणुका पार पडल्यानंतर म्हाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like