पिंपरी : ATM सेंटर मध्ये चोरीचा प्रयत्न, ‘कॅश’ जळाल्याची शक्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाकड-डांगे चौक, दत्त मंदिर रस्त्यावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटर मधील मशीन मधून पैसे काढण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला. मात्र ओढाओढी केल्याने मशीन मध्ये स्पार्क होऊन जाळ झाला आणि मशीन जळाले.

हा प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला असण्याची शक्यता असून सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. मशीन मध्ये असणारी कॅश जळाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दत्त मंदिर रस्त्यावर आयसीआयसीआय आणि अक्सिक्स बँकेचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यानी ओढाओढ केली असल्याने जाळ होऊन सर्व मशीन जळाले असल्याचे बँकेच्या टेक्निशन यांनी सांगितले.

एटीएम सेंटर मध्ये किती रक्कम होती याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहेत.

You might also like