Coronavirus : दोघांचा मृत्यू, भोसरी व वडमुखवाडी मधील काही परिसर ‘सील’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी भोसरी येथील दोघांचा कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झाला आहे. तर सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २३३ वर पोहोचली आहे.

भोसरी येथील क्षितीज डेस्टीनेशन परिसरातील भारत पेट्रोलीयम पंप, ग्लोबल स्कुल, दुर्वांकुर लॉन्स मागील बाजू, बनाचा ओढा, सिमेंट ग्राऊड, महालक्ष्मी जनरल स्टोअर ए १, चायनिज सेंटर, भारत पेट्रोलीयम पंप परिसर तसेच वड्मुखवाडीतील अलंकापुरम रोड परिसरातील श्री समर्थ गेरेज, शिवराज ग्रीन टेक, अलंकापुरम रोड, नील मोटर्स, श्री समर्थ गॅरेज हा परिसर मध्यरात्री आकरा वाजल्यापासून कन्टेनमेंट झोन घोषीत केला आहे. तर पुढील आदेशापर्यंत हे परिसर सील करण्यात आले आहेत. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यामस नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.