भिषण अपघातात दोन ठार, दोन जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वेगातील ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-नाशिक रोडवर मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ झाला. रघुवीर बाबुराव भावसार, मोहन भागान्ना माळवदकर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रल्हाद आंगळे, आनंद भावसार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आर.जे. 19, जी.जी. 1147 या ट्रक वरील चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि जखमी एम.एच 14, एफ. एस 9254 या कारमधून जात होते. ते मोशी जवळ जुना जकात नाका येथे बोर्‍हाडेवाडीकडे जाण्यासाठी नाशिक रोड क्रॉस करत होते. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरून एक ट्रक भरधाव वेगात आला. त्या ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या कारला जोरदार धडक दिली.

यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर आरोपी ट्रकचालक घटनेची माहिती न देता पळून गेला आहे. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहे.

You might also like