पिंपरी : मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना कामशेत परिसरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली.

या प्रकरणी ६८ वर्षीय मुख्याध्यापक मोहम्मद अली याला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. याच वसतिगृहात दहा दिवसांपूर्वी केअरटेकर रसूल याने १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याच घटनेचा तपास करत असताना कामशेत पोलिसांना दुसऱ्या एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात असणाऱ्या वसतिगृहात ज्यांना आई वडील नाहीत असे मुले शिक्षण घेतात, तसेच तिथे राहण्याची देखील सोय आहे. दरम्यान, केअरटेकर रसूल याने एका १४ वर्षीय वसतिगृहातील मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलाला नातेवाईक घरी घेऊन गेले होते. तेव्हा, ही गंभीर घटना नातेवाईकांना मुलाने सांगितली होती. तात्काळ नातेवाईकांनी कामशेत पोलिसात तक्रार दिली आणि केअरटेकर रसूल ला जेरबंद केले. परंतु, कामशेत पोलिसांची वसतिगृहातील मुलांकडे चौकशी सुरू होती तेव्हा अन्य एका १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली. तपास पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com