शहरातील ATM फोडणार्‍यांना पोलिसांकडून लगाम, वाकड पोलिसांनी हरियाणातून पकडली आंतरराज्यीय टोळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या एटीएम सेंटर फोडून लाखो रुपये लंपास करण्याच्या गुन्ह्यांना वाकड पोलिसांनी लगाम लावला आहे. हरियाणा 4राज्यातून येऊन महाराष्ट्रात एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक करुन पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडीचे आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून तीन लाखांची रोकड, तीन कार, दुचाकी असा सुमारे 20 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

झरुद्दीन ताहीर हुसेन (29, रा. टोंका, पलवन, हरियाणा), सरफुद्दीन हसीम (22, रा. हरियाणा), मोहमद शकिर हसन (35, रा. हरियाणा), संदीप माणिक साळवे (43, रा. जांभे, ता. मुळशी, पुणे), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (42, रा. थेरगाव, पुणे), गौतम किसन जाधव (38, रा. थेरगाव, पुणे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. शहरातील विविध भागात एटीएम फोडण्याचे सत्र सुरु होते. यातच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथील एटीएम सेंटर फोडले. चोरट्यानी फोडण्यापूर्वी चोरट्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसर पालथा घातला होता.
या गुन्ह्यात एका स्थानिक गुन्हेगाराचा समावेश होता. याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना हरियाणामधील मुख्य आरोपीने फोन केला की पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ‘तू अंडरग्राऊंड होजा.’ वाकड पोलिसांनी तात्काळ दिल्ली गाठले. दिल्ली विमानतळावर सापळा रचला. मुख्य आरोपीला घेण्यासाठी बोलावले. मुख्य आरोपी विमानतळावर आला असता त्याला फिल्मी स्टाइल अटक केली.

वाकड पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. या डिटेक्शनच्या टीमचे राज्यातील बेस्ट डिटेक्शनसाठी सादर केले जाणार आहे, असे सांगत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वाकड पोलिसांच्या पथकाला 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, बिभीषण कन्हेरकर, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक भोसले, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.