पुणे : लग्नानंतर पती पत्नीला देत नव्हता ‘सुख’, नंतर कळालं तो ‘गे’लेला दुसरीकडं अन् भलतच ‘वास्तव’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पती नपुसंक असल्याची माहिती लपविल्या प्रकरणी विवाहितेने पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात विवाहितेचा छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 फेब्रुवारी 2018 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी आणि वडगावशेरी, पुणे येथे घडली. पती नपुसंक असल्याची माहिती सासरकडील मंडळींनी लपवून ठेवली. लग्न झाल्यापासून आपल्याला वैवाहिक सुखापासून पतीने वंचित ठेवले. एवढेच नाही तर पतीने इतरांशी असलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ क्‍लीप आपल्याला पाठविली.

तसेच सासरकडील मंडळींनी फिर्यादीला पाच लाख रुपयांची मागणी केली. लग्नात मानपान केला नाही म्हणून तिचा शाररीक व मानसिक छळ केला. तसेच नांदविण्यास नकार दिल्याने विवाहितेला तिच्या आई-वडिलांकडे सोडून दिले. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like