पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

लग्नाचे अमिष दाखवून एका ४४ वर्षीय महिलेची ३ लाख ४० हजार रुपयांची आर्थीक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार डिसेंबर २०१७ ते बुधवार (दि.२३) दरम्यान पिंपरी येथे घडला. याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरिचीत देसाई (वय-४३ रा. मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी येथील ४४ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने शादी डॉट कॉम या वेबसाईटवर विवाहासाठी नाव नोंदणी केली होती. या साईटच्या माध्यमातून देसाई आणि फिर्यादी महिलेची ओळख झाली. देसाई याने आपण सॉफ्टवेअर इंजिनीअर असून प्रती महिना अडीच लाख रुपये पगार असल्याचे सांगितले. तसेच आई-वडील अमेरीकेत असून मी लवकरच ऑस्ट्रेलीया येथे जाणार आहे. त्यामुळे लकरात लवकर लग्न करायचे असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादीत केला. तसेच वाकड येथे घर खरेदी करण्यासाठी त्याने महिलेकडून ३ लाख ४० हजार रुपये घेऊन पसार झाला. आपली आर्थीक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे करीत आहेत.