पुण्यात तरुण व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राहते घरात तरुण दुकानदाराने छतावरील पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार चाकण गावच्या हद्दीतील विशाल गार्डनमध्ये घडला. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. महेंद्रसिंग गणपतसिंग देवडा (२९ वर्षे, सध्या रा. विशाल गार्डन, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. महेंद्रसिंग मोहनसिंग परमार (२७ वर्षे, सध्या रा. विशाल गार्डन, चाकण, मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

महेंद्रसिंग याचे चाकण येथील विशाल गार्डनमध्ये एक इलेक्ट्रिक मोटारचे दुकान आहे. बुधवारी ( दि. ४ ) सायंकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नव्हते. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. घरातील बेडरूममधील छतावरील सिलिंग पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेवून त्याने आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी महेंद्रसिंग देवडा हा कोठेच दिसत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. बेडरूममध्ये डोकावून पाहिले असता घरातच वरील प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. तपास चाकण पोलीस करत आहेत.