पिंपरी : वाल्हेकरवाडी येथे तरुणाचा गळ्यावर वार करुन खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड येथील वाल्हेकरवाडी रोडवरील शेतात एका तरुणाच्या गळ्यावर वार करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तीन मोटारसायकलवरुन आलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विशाल ज्ञानेश्वर चिंचवडे (वय ४१, रा  . वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. चिंचवडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे रानमळा हॉटेलसमोर ज्वारीचे शेत आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तीन मोटारसायकलवरुन काही जण एका तरुणाला घेऊन आले. त्यांनी ज्वारीच्या शेतात या तरुणाच्या गळ्यावर धार धार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्याजवळील सर्व वस्तू काढून घेऊन ते पळून गेले. खुन करण्यात आलेला तरुण हा साधारण २० वर्षाचा असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक मडके अधिक तपास करीत आहे.