Pink Salt Tea | सर्दी, खोकला आणि डोकेदुखीने असाल त्रस्त तर आजच बनवा सैंधव मीठाचा चहा; शरीरात एनर्जी सुद्धा वाढवतो; डायबिटीज रूग्णांसाठी चांगली पसंत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pink Salt Tea | हिवाळ्यात लोकांना चहा प्यायला आवडते. त्यामुळे त्यांच्या शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. पण जास्त चहा पिणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही आणि त्यामुळे आजार देखील होऊ शकतात. पण जे लोक जास्त चहा पितात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. होय, असा एक चहा आहे, ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमच्या शरीराला आजारांपासून वाचवू शकता. (Pink Salt Tea)

 

या चहाला सैंधव मीठाचा (Pink Salt) चहा म्हणतात. तो पिण्याचे अनेक फायदे आहेत. सामान्य चहाऐवजी हा चहा पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सैंधव मीठाच्या चहाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

 

* असा बनवा सैंधव मीठाचा चहा (How to Make Pink Salt Tea)
सैंधव मीठाचा चहा बनवणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला ब्लॅक टी प्यायला आवडत असेल तर तो बनवण्यासाठी गरम पाणी घ्या. मग चहापत्ती आणि सैंधव मीठ घालून उकळवा. चहा तयार झाल्यावर प्या.

 

दुसरीकडे, जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल तर चहापत्ती पाण्यात उकळून घ्या आणि एका कपमध्ये दूध आणि नंतर चवीनुसार गुलाबी मीठ घालून तयार करा.

 

* सैंधव मीठाचे फायदे (Pink Salt Tea Benefits)
सैंधव मीठाचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात याचा वापर केल्याने तुमचे शरीर उबदार आणि निरोगी राहते. त्याच्या रोजच्या सेवनाने शरीरात होणारे बदल पाहू शकता.

1. घसादुखीपासून आराम
सैंधव मीठामुळे घशाची खवखव दूर होते. इम्युनिटी वाढते, आजारापासून दूर राहता. यामुळे सर्दी, खोकला आणि घशातील कफची समस्याही दूर होते. याच्या वापराने घशात जमा झालेला कफही सहज निघून जातो.

 

2. इम्युनिटी वाढते
सैंधव मिठाचा चहा इम्युनिटी वाढवतो. खोकला आणि सर्दीचा त्रास होत असेल तर हा रामबाण उपाय आहे.
तसेच मौसमी आजारांपासूनही आपले संरक्षण होते. (Pink Salt Tea)

 

3. डोकेदुखीची समस्या होते दूर
हा चहा तुमची डोकेदुखीची समस्याही दूर करतो. सामान्य डोकेदुखी दूर करण्यासाठी याचा वापर करू शकता.

 

4. शरीरात ऊर्जा वाढते
या चहामध्ये शरीरात ऊर्जा वाढवणारे गुणधर्म असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी सोडियमची गरज असते, त्यामुळे या चहाच्या सेवनाने आपल्या शरीराला सोडियम मिळते.
अशा प्रकारे शरीराला सोडियमपासून ऊर्जा मिळते.

 

5. उबदारपणा देतो
साधारणपणे चहा आपल्या शरीराला ऊब देतो, पण सैंधव मीठाच्या चहाचा जास्त परिणाम होतो.
यामुळे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त उष्णता मिळते, जी थंडीत खूप फायदेशीर असते.

 

6. मधुमेहासाठी सर्वोत्तम
मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे साखरयुक्त चहा पिण्यास मनाई आहे, परंतु ते कोणत्याही भीतीशिवाय हा चहा पिऊ शकतात.
त्यात साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा गुणधर्म आहे, ज्यामुळे तो मधुमेहींसाठी फायदेशीर चहा ठरतो.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pink Salt Tea | pink salt tea will help you in cold flu increase energy give warmness must for diabetes patient

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ची बेस्ट योजना ! घरबसल्या महिन्याला कमवू शकता 60 हजार रुपये; जाणून घ्या

 

LIC Aadhaar Shila | पत्नीला Wedding Anniversary ला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये करा जमा

 

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू