JNU : Video शेअर करुन ‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी, ‘पिंकी चौधरी’नं दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतल्या आहेत. या हल्ल्याचा तपास पोलिसांकडून सुरु असतानाच हिंदू रक्षा दल या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडीओच्या माध्यमातून ही माहीती दिली आहे. त्याने हा हल्ला हिंदू रक्षा दलानेच केल्याचा दावा केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये चौधरी याने म्हटले आहे की, जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यासारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं योग्य नाही. गेल्या अनेक वर्षापासून जेएनयू हा डव्यांचा अड्डा झाला असल्याचा आरोपी चौधरी याने यावेळी केला आहे. रविवारी जेएनयूमध्ये हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते असा दावा चौधरीने केला आहे. पिंकी चौधरीने केला आहे. पिंकी चौधरीच्या विरोधात याआधीही काही गुन्हे दाखल आहेत. याला आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला केल्या प्रकरणी जेलमध्ये जावे लागले होते.

काय घडले होते जेएनयूमध्ये ?
जेएनयुमध्ये झालेल्या हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. ज्या ठिकाणी हाणामारी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुमालानं चेहरा लवलेल्या गुंडांनी कोडवर्डचा वापर करुन हिंसाचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फी वाढीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्ट परीक्षेवर बहिष्कार घातला होता. डव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रुम ताब्यात घेतली होती. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रियाही बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्याने काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/