पिंपरीमध्ये कोयत्याचा धाकाने व्यापाऱ्याला लुटले 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी येथील भुयारी मार्गाजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यापारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यानी लुटले. सुमारे 15 हजार रूपये जबरदस्ती काढून घेतल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री पावनेएकच्या सुमारास घडला. यातील संशयीत पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

याप्रकरणी गिरीष रमनानी (32, रा. पिंपरी) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीष आणि शील आसवानी हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. पिंपरी भुयारी मार्गाजवळ लघुशंकेसाठी थांबले त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यानी दोघांच्या मानेवर कोयता ठेवला. त्यानंतर जबरदस्तीने शीलच्या खिशातील 14 हजार 950 रूपये आणि इतर ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.याघटनेचा तपास पिंपरी पोलिस करत आहेत.