आधीच कमी दाबाने पाणी, त्यात जलवाहिनी फुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मुळात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतानाच शिवाजीनगर वसाहतीमध्ये पुनर्विकासाच्या कामादरम्यान जलवाहिनी फटली आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. मागील काही महिन्यांपुर्वी येथील महिलांनी पाण्यासाठी आंदोलनही केले होते. त्यानंतरही त्यांची होरपळ काही थांबत नसल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीमध्ये जुनी बैठी घरं आहेत. त्या घरांच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. त्यामुळे या परिसरात बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे ट्रक ये जा करतात. यापूर्वीदेखील जलवाहिन्या फुटण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा जलवाहीनी फुटली आहे. त्यामुळे वसाहतीतील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आधीच मागील दोन दिवसांपासून वसाहतीत कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे दोन दिवसांतून अर्धा तास पाणी मिळत आहे. या प्रकाराने सर्व कुटुंबे त्रस्त झाली आहेत. असे वसाहतीतील महिलांनी सांगितले आहे. काही महिन्यांपुर्वी महिलांनी अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रास्ता रोको केला होता.

गेल्या काही वर्षांपासून वसाहतीत वसाहतीतील बैठ्या घरांच्या पुनर्विकासाचे काम सरु असल्याने कामासाठी जैसीबी तसेच अवजड वाहने येथे येतात. त्यामुळे जलवाहिनी वारंवार फुटते असे सांगितले.