मीन राशिफळ 2021 : मीन राशीवाल्यांसाठी कसे असेल 2021 वर्ष, जाणून घ्या वार्षिक राशिफळ

पोलिसनामा ऑनलाइन – 2021 मागील वर्षाच्या तुलनेत अधिक प्रोफेशनल असणार आहे. तुम्हाला यावर्षी स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी विचार आणि प्रयत्न करावे लागतील. 2020 मध्ये ज्या संकट आणि संघर्षाचा सामना केला आहे, हे वर्ष त्याचा लाभ घेण्यासाठी उत्तम असेल.

मानसिक स्थिती :
नवीन वर्षात समस्यांपासून मुक्ती मिळेल. वेळ आणि पैशाची योग्य गुंतवणूक करण्याची आवश्यक आहे. मीन राशीच्या लोकांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. स्वभावाबाबत बोलायचे तर 2021 मध्ये अति उत्साहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर एखादी व्यक्ती आपल्याशी नकारात्मक बोलत असेल किंवा दुसर्‍या व्यक्तीबाबत वाईट सांगत असेल तर पूर्ण सत्यता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका. ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कानांद्वारे अशुद्ध गोष्टींच्या मनात प्रवेश करेल, म्हणून योग्य आणि चुकीच्या दोन्ही गोष्टी फिल्टर केल्या पाहिजेत. लहान भावंडांकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे, त्यांना एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल किंवा तणावात असतील तर त्यांना मदत करा. कामाच्या बाबतीत मानसिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात ज्या समस्या होत्या त्यांच्यापासून मुक्ती मिळू शकते. घराचे वातावरण प्रफुल्लित होईल.

वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंदाची संचाराची शक्तता आहे. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याचे आहे, चांगले गुण मिळवून गुणवत्ता दाखवावी लागेल. एप्रिलनंतर पैसे खर्च होण्याची गती वाढेल, म्हणून अनावश्यक खर्च थांबवा. याशिवाय, जमीन, घर, विवाह किंवा शिक्षणात पैसे खर्च करण्याची स्थिती असेल, जे आवश्यक असेल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्यासाठी अनिवार्य असतील. त्यांची सेवा करण्याचे सौभाग्य मिळत असेल तर ते हातातून जाऊ देऊ नका. समाजसेवा करण्याची संधी मिळाली तरीही भाग घ्या.

कर्मक्षेत्र :
हे वर्ष थोड्या मेहनतीने मोठी आर्थिक प्रगती आणि पदोन्नती देईल. नोकरदार लोकांना 2021 मध्ये आर्थिक प्रगतीसह पदोन्नती मिळेल. नोकरीत कोणतीही प्रगती दिसत नसेल तर दुसर्‍या नोकरीचा कॉल येईल. सरकारी नोकरीत कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका, अन्यथा कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात. व्यवसायासाठी वर्ष चांगला नफा मिळवून देणारे आहे. परंतु मेहनत केल्यानेच फायदा होईल हे लक्षात ठेवले पाहिजे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एक्सपोर्ट करणार्‍यांसाठी काळ अनुकूल आहे. न्याय क्षेत्रात वर्ष खुप सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. ज्ञान वाढवण्याची आणि चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल.

मे ते जुलै या काळात ज्यांचे पैसे अडले आहेत किंवा कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी मार्ग खुले होतील. यामुळे तणावही कमी होईल. जे व्यवसायात वाचन-लिखाणाशी संबंधित काम करतात त्यांना देखील चांगले फायदे मिळतील. नोकरीत ऑफिसमधून एखादा कोर्स किंवा नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळाली तर लाभ घ्या. स्पर्धा परीखेची तयारी करणार्‍यांसाठी हे वर्ष मे नंतर चांगले परिणाम देईल. युवा वर्गाने अभ्यास करताना सतर्क रहावे, लक्ष विचलित करणारे आणि नकारात्मक भावना मनात येणार नाहीत, याची काळजी घ्या. अनेक वर्षांपासून स्पर्धेत यश मिळवत नव्हते, त्यांना यावर्षी चांगली बातमी मिळेल.

आरोग्य :
हात, कान यांच्या सुरक्षिततेबद्दल जागरुक रहा, पोट-मधुमेहाची नियमित तपासणी करण्याची आवश्यक आहे. 2021 मध्ये आरोग्याची स्थिती सामान्य असेल. हातांची काळजी घ्या. दुखापतींमुळे फ्रॅक्चर वगैरे होऊ शकते, म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. कानांच्या काळजीत निष्काळजीपणाने वागू नका, संसर्ग होण्याची शक्यता आहे. कानाच्या पडद्याचा त्रास असेल तर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पोहणार्‍यांनी त्यांच्या कानांची योग्य काळजी घेतली पाहिजे. पाण्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

मे ते डिसेंबर पर्यंत अधून-मधून शारीरिक दुर्बलता जाणवू शकते, म्हणून खाणेपिणे संतुलित आणि सपक ठेवा. मधुमेहाच्या रूग्णांना विशेष सतर्क राहावे लागेल. नियमित आरोग्य तपासणी केल्यास फायदा होईल. ऑगस्ट महिन्यात पोटाची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या वेदना ही आतड्यांशी संबंधित समस्येची लक्षणे असण्याची शक्यता असू शकते. अगोदरपासूनच पोटाच्या समस्या असल्यास, सावधगिरी बाळगली पाहिजे. यावर उपाय म्हणून मकरसंक्रांतीला आपल्या वजनाच्या बरोबरीने गहू दान करावे.