पिस्ता खाण्याचे ‘हे’ 7 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सुकामेवा खाणे चांगले असते, हेल्दी असते, हे आपण जाणतो. पण तो फारसा खाल्ला जात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. पिस्ता हा चवीला उत्तम ठरतो. हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शियम आणि इतर अन्य पोषक तत्वे असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. तर पाहुयात पिस्ता खाल्याने काय काय फायदा होतो….

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

१. पिस्त्यात असलेल्या फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचेचा नैसर्गिक रंग उजळतो.

२. सतत बसून टीव्ही पाहणं, तासंतास कॅम्प्युटरवर काम करणं आणि वाढत्या वयानुसार डोळ्याची दृष्टी कमकुवत होते. पिस्ता डोळ्याचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो.

३. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरत. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यात असणारे गुणधर्म हृदयाचं आरोग्य चांगले राखते.

४. चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो. हे एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षण रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

५. डायबिटीज वाढण्यापासून रोखण्याच काम करतो. यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे साखर नियंत्रणात राखण्यास मदत होते.

६. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून लहान मुलांना पिस्ता खाण्यासाठी देणे चांगले आहे.

७. शरीरावर सूज आल्यास पिस्त्याचे सेवन करणं फायदेशीर ठरत. यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई मुळे सूज कमी होण्यास मदत होते.

८. मूठभर पिस्ता खाल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच त्यातील व्हिटॅमीन बी ६, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस मुळे अन्नपचनाची क्षमता सुधारते.

(टिप : यापैकी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)