पुण्यात भल्या सकाळी पिस्तुलच्या धाकानं IIFL गोल्ड फायनान्सचं कार्यालयात लूट, 50 लाखाचा ऐवज लुटल्याचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-नगर रस्त्यावरील आयआयएफएल गोल्ड लोनचे कार्यालयात शिरलेल्या पिस्तूल धार्‍यांनी लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. भल्या सकाळी हा प्रकार घडला असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेने याठिकाणी धाव घेतली आहे. दरम्यान, येथून जवळपासून 50 लाखाहून अधिक सोने नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील भाजी मार्केट परिसरात आनंद इम्पायर या बहुमजली इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला आयआयएफएल गोल्ड लोनचे कार्यालय आहे. मुथ्तुट फायनान्स सारखे हे कार्यालय आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हे कार्यालय उघडल्यानंतर येथील कर्मचारी नेहमीप्रमाणे बसले होते. त्याचदरम्यान साडे दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास तिघेजन आत शिरले. त्यातील दोघांकडे पिस्तूल होते.

तर, एकजन बाहेर उभारला होता. दोघांनी कर्मचार्‍यांना पिस्तूल दाखवून येथील सोने बॅगेत भरून पोबारा केला. काही काळ चाललेला हा धिंगाना मात्र, परिसरात माहित नव्हता. चौघेही सोन्याच्या बॅगा भरून पसार झाल्यानंतर या कर्मचार्‍यांनी चंदननगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर याची माहिती वार्‍या सारखी पसरली. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह चंदननगर पोलीसांनी याठिकाणी धाव घेतली आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. चोरट्यांनी जवळपास 50 लाखाहून अधिक सोने चोरून नेल्याची माहिती आहे. नेमके किती सोने गेले आहे, त्याचा हिशोब सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.