पिस्तूलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणारे फरार आरोपी जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

चौफुला बोरीपार्धी ता.दौंड येथील (दि.०४/१२/१७) दुकानात शिरून व्यापाऱ्यास पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणारा गुन्ह्यातील फरारी आरोपी महावीर अडागळे यास मिरजगाव जि.अहमदनगर येथून ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

मौजे बोरीपार्धी गावचे हद्दीत चौफुला पुणे ते सोलापूर रोड लगत मंथन स्पन पाईप नावाचे दुकानात फिर्यादी नामे घनश्याम भापकर हे हजर असताना दुकानात अनोळखी तीन इसमांनी प्रवेश करून फिर्यादीच्या डोक्याला पिस्तुल लावून एकूण ५०,०००/- रु. रोख व मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचा, यवत पोलीस स्टेशनला जबरी चोरी व आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

[amazon_link asins=’B073VMBXLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9c95242-9287-11e8-b128-8123bfccb4eb’]

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असलेने तो उघडकीस आणणेसाठी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांचे आदेशाने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे पथकाने करून सदर गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यात १) अल्ताफ चांदसाहेब पठाण, २) आमिर बाबा शेख, दोघे रा. मुळानगर, राहुरी, जि.अहमदनगर, ३) आदित्य सुभाष बेल्हेकर रा. दिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर, ४)  विकास सुरेश अडागळे रा. वडगाव रासाई ता. शिरूर जि. पुणे व गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल घेणारा ५) महेश अंकुश खोरे वय २६ रा.गार ता. श्रीगोंदा जि. अहमनगर यांना अटक करून यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले होते.

परंतु सदर गुन्हयाच्या तपासात महावीर अडागळे रा. रवळगाव, ता. कर्जत, जि.अहमदनगर हा निष्पन्न झालेला आरोपी हा गुन्हा झालेपासून अद्याप फरार होता. पोलीस मागावर असल्याने तो गावी न राहता पुणे मुळशी येथे नाव, पत्ता बदलून राहत होता. एलसीबी शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पथकातील  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, समाधान नाईकनवरे असे जिल्हयातील रेकॉर्डवरील फरारी पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे पथकास वरील गुन्हातील फरारी आरोपी महावीर उत्तम अडागळे वय २९ वर्ष  हा त्याचे गावी रवळगाव मिरज जि.अहमदनगर येथे येणार असल्याची माहीती मिळालेवरून पोलीस पथकाने वेशांतर करून गावामध्ये मुक्काम करून आरोपीची माहीती काढून त्यास शिताफीने ताब्यात घेतलेले आहे.

आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आज रोजी त्यास मे. दौंड कोर्ट येथे हजर केले असून त्यास पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.

आरोपीने फरार झालेपासून आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.