‘विदाऊट’ तिकीट तरुणाकडे सापडले ‘पिस्तुल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे तिकीट तपासणीसाने तिकीट मागतिल्यावर त्याच्याशी हुज्जत घातल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तरुणाकडे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा,  जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस राजेंद्र काटकर यांनी नवनाथ पोळ याच्याकडे तिकीटाची विचारणा केली. त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी मणिराम सयाम यांच्या ताब्यात दिले. यावेळी नवनाथ पोळ सुरक्षा दलाच्या जवानाबरोबर हुज्जत घालत होता. यावेळी सुरक्षा दलाचे जवान म्हणाले की, बेकायदेशीररीत्या फिरत आहे. त्यामुळे तू सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करीत आहोत. असे सांगून त्याची तपासणी करण्यात आली असता त्याच्या पॅन्टच्या खिश्यात पिस्तूल मिळून आले. त्यात एक जिवंत काडतुस होते.

पोलिसांनी ३५ हजार रुपयांचे पिस्तूल आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आपल्याला लिंबी गावात हे पिस्तुल सापडले असल्याचे पोळ याने पोलिसांना सांगितले.

Loading...
You might also like