पिंपरी-चिंचवड शहरात ‘पिस्तूलांचा बाजार’

पिंपरी : अमोल येलमार

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी ही सर्व परिचित आहेच, त्यामुळेच शहरातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. सराईत गुन्हेगारांचे खून, व्हाईट कॉलर गुन्हेगारांच्या हत्या, वाहनांची तोडफोड, महिलांची असुरक्षितता, कंपन्या, व्यवसायकडून हप्ता वसुली, जमिनीच्या ‘लिटीगेशन’मधून दहशत आणि भाई, अल्पवयीन गुन्हेगार यामुळे पिंपरी-चिंचवड शहर गुन्हेगारी नगरी झाले होते. या सोबतच शहरात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याची संख्या मोठी आहे. अनेक गुन्ह्यामध्ये अश्या हत्यारांचा वापर केला जातो. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर हे अधोरेखीतच झाले आहे. एक महिन्यात सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ पिस्तुल आणि ३६ काडतुसे मिळाली आहेत. तर चालू वर्षात आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यात ४१ पिस्तुल आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b558827-bbcf-11e8-9d8d-959a19891fec’]

पिंपरी-चिंचवड शहर गुन्हेगारी कारवायामध्ये नेहमीच चर्चेत असते. अगदी लिंबूची फोड देण्यापासून ते गँगच्या वादातून खुनाचे प्रकार घडलेले आहेत. यासोबत महिलांच्या सुरक्षा बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सामूहिक बलात्कार, अल्पवयीन म्हणजे अवघ्या ४ ते ५ वर्षाच्या मुलींचे अपहरण करुन अत्याचार व खून अशाही घटना घडलेल्या आहेत. शहरात आयटी पार्क, मोठे गृह प्रकल्प आणि शैक्षणिक संस्था आल्याने जमिनीचे भाव वाढले आणि बहीण-भावाच्या नात्यात दुरावा आला तर सखा भाऊ मारेकरी झाला. याच सोबत शहरात सराईत गुन्हेगारानी आपले पाय मजबूत केले.

शहरामध्ये अल्पवयीन गुन्हेगार मोठ्या संख्येने आहेत, तर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची संख्या मोठी आहे . या गुन्हेगारामध्ये पिस्तुल जवळ बाळगणे हे एक ‘स्टेटस’ झाले आहे. यामुळे शहरातील अनेक गुन्हेगारांकडे पिस्तुल हे आहेच. तर काहीजण खरेदी-विक्रीचा धंदाही करत आहेत. मात्र पोलिसांना ती सापडत नाहीत हे आश्चर्य असते.

पुण्यात दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या कारचालकाला तीन महिन्यांची कैद

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर गुन्हे शाखेचे ब्राह्मनंद नाईकवाडी यांना मिळालेल्या माहितीवरून निगडी ओतास्कीम येथे छापा टाकून एका ‘इंजिनियर’ला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे चौकशी करून त्याच्याकडून आणि दिघी येथील लॉज मालकाकडून ७ पिस्तुल आणि १५ काडतुसे जप्त केली. याच अटक केलेल्या लॉज मालकाच्या लॉजवर दिघी पोलिस रुम तपासणी करायला गेले होते, त्या ठिकाणी व्यवस्थापकाने सहकार्य न केल्याने झालेल्या वादातून पोलिसांनी त्याला मारहाण केली होती.

 

गणेशउत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन

गुन्हे शाखेने पिस्तूलाची कामगिरी केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या तपासी पथकांना जाग आली आणि त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पिंपरी पोलिसांनी तर ‘कॉम्बिग ऑपरेशन’ करताना दोन तडीपार गुंडांना अटक करुन त्याच्याकडून पिस्तुल जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी ५ पिस्तुल, ९ काडतुसे जप्त करून ५ आरोपींना अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी २ पिस्तुल, ३ काडतुसे जप्त करून एका आरोपीळा अटक केली आहे. निगडी पोलिसांनी २ पिस्तुल, ६ काडतुसे जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १ पिस्तुल, १ काडतुसे जप्त करून एकाला अटक केली आहे. वाकड पोलिसांनी १ पिस्तुल जप्त करून एकाला अटक केली आहे.

तिजोरीत खडखडाट असल्याने निवडुकीसाठी काँग्रेस मागणार जनतेकडे पैसे

सांगवी पोलिसांनी १ पिस्तुल, २ काडतुसे जप्त करून एकाला अटक केली आहे. ग्रामीण पोलिसांकडून समाविष्ठ झालेल्या पोलीस ठाण्यातील तसेच दिघी पोलिसांनी एकही पिस्तुल जप्त केले नाही. एका महिन्यातच सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेली पिस्तुल आणि जिवंत काडतुसे पाहता भितीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी पिस्तुल कोठून येतात, कोण आणतात याचा शोध घेऊन ही कीड मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे. शहरात बेकायदेशीर पिस्तुलांची माहिती असणारे कर्मचारी काही पोलीस ठाण्यात आहेत, त्यांना चार्ज करण्याची गरज आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7f9a014-bbd3-11e8-a97a-d3d80a218d29′]